तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 October 2019

सरकार जागे व्हा ! ‘पुन्हा आणुया आपले सरकार’ टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

बुलढाणा
राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक राजकीय पक्ष शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून घोषणांचा पाऊस पाडत आहे. भाजप सरकार तर शेतकऱ्यांचा खरा कैवारी असल्याचे भासवत असतनाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुन्हा आणूया आपले सरकार असं भाजपची टी-शर्ट आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने घातलं असल्याची माहिती समोर आली आहे.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे पुढच्या काही वेळातच जळगाव जामोद मतदार संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आहे. या सभेत राजकीय फटकेबाजी करत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या आहेत.कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघातील ही घटना आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड इथली सकाळी 11 वाजताची घटना आहे. 35 वर्षीय राजू ज्ञानदेव तलवारे असं मृतकाचं नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी यवेल्यामध्येही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.मोर्शी तालुक्यातील येवला येथील यूवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेचं वार आहे. प्रत्येक पक्षाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आश्वासन दिली जात असताना खरं पाहिला गेलं तर शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागत नसल्याचं या घटनेमुळे समोर आलं आहे. तरुण शेतकऱ्याच्या अशा आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष हरोडे असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्याकडे 4 एकर शेती आहे. शेतीसाठी हरोडे यांनी आतापर्यंत साडे तीन लाख रुपये कर्ज काढलं. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नापिकी ओढवली. या सगळ्यावर हरोडे त्रस्त झाले होते. कर्ज कसं फेडावं आणि मुलांचं पालनपोषण कसं करावं याचा सतत विचार करत होते. याच नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अखेर येवला जवळच्या अमरावती नरखेड रेल्वे मार्गावर संतोष यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घरातील कपड्यामध्ये चिट्ठी लिहून ठेवली होती. त्या चिट्ठीमध्ये त्यांनी कुटुंबाची माफी सुध्दा मागितली होती. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण हरोडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ज्याच्या जीवावर घरात चूल पेटत होती तोच आता या जगात नसल्यामुळे लहान लेकरांनी कोणाकडे बघायचं असा मोठा प्रश्न हरोडे कुटुंबासमोर आहे.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment