तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

ना. पंकजाताई यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर परळीतील मुस्लिम महिला भगिनीही झाल्या फिदा! ; राष्ट्रवादीने मुस्लिमांचा फक्त मतासाठी वापर केला, भाजपने मात्र विकास साधला महिलांमध्ये जागवला आत्मविश्वास
  

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०९---- काॅग्रेस- राष्ट्रवादीने आतापर्यंत मुस्लिम समाजाचा वापर फक्त मते मिळवण्यासाठी केला, आम्ही मात्र त्यांचा खरा विकास साधला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी आणि माझे सरकार वचनबद्ध आहोत. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवले असुन आगामी काळात ही चळवळ आणखी गतीमान करण्यासाठी महिलांनी साथ आणि आशीर्वाद द्यावे असे आवाहन राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. यावेळी अल्पसंख्याक महिलांची मोठी उपस्थिती होती.

  भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भोई गल्ली, फतानपुरा येथे अल्पसंख्याक महिलांची बैठक झाली. यावेळी महिलांनी आपल्या भावना ना. पंकजाताई मुंडे यांच्या जवळ व्यक्त केल्या. महिलांशी संवाद साधताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, महायुती सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी फार मोठे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे "सबका साथ, सबका विकास" अशी घोषणा करून सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन काम करीत आहेत. आपल्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी बीडला पासपोर्ट कार्यालय आणल्याने हजला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय दुर झाली आहे. असे सांगून नगर परिषद ताब्यात नसतानाही गल्लोगल्ली अगदी दर्जेदार रस्ते तयार केले तर आगामी काळात खडका धरणातून परळीला पाणी देणार आहे असे सांगून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटांना मोठा निधी दिला आहे. अल्पसंख्याक महिलांनीही यात सहभागी व्हावे असे सांगून शहराच्या विकासासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपली ताकद माझ्या पाठीशी उभी करा असे आवाहन त्यांनी केले.
     यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जुगरकिशोर लोहिया, युवानेते निळकंठ चाटे, शिवसेनेचे राजाभैया पांडे, शेरूभाई, खदीरभाई, गोविंद कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment