तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 21 October 2019

परभणी जिल्ह्यात सरासरी ६६.२७ टक्के मतदान;पाथरी मतदार संघात आठ गावांचा बहिष्कार

किरण घुंबरे पाटील
परभणी:-आज सकाळी पावसाळी वातावरणात सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेत अगदी  शांततामय वातावरणात सायंकाळी सहा वाजता पुर्ण झाल्याची माहिती प्राप्त झाली असून जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात अंदाजित ६६.२७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक विभागाकडून प्राप्त झाली आहे.तर पाथरी विधानसभा मतदार संघातील रस्ता आणि विम्याचे कारण देत आठ गावांनी मतदानावर संपुर्ण पणे बहिष्कार टाकल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आज पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभा मतदार संघात ६०.९२,जिंतूर ७२.००, गंगाखेड ६३.२९ आणि पाथरी ६८.५०टक्के असे सरासरी जिल्ह्यात ६६.२७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणुक विभागाच्या सुत्रांनी दिली. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार सकाळी रिमझिम पावसात मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली हाेती सुरूवातीला मतदारांचा संथ प्रतिसाद दिसुन येत हाेता. मात्र दुपारी पावसाची रिपरिप कमी हाेताच मतदानाचा टक्का वाढतांना दिसुन आला.यात सकाळच्या सत्रात  
मतदान
 ११ वाजेपर्यंत पाथरी१६.११% जिंतूर१९%  गंगाखेड १३.८९%  परभणी १६.८३%

दुपारी १ पर्यंत पाथरी३३.६४%  परभणी ३०.३१%  जिंतूर ३६.२५%  गंगाखेड २८.२४%

दुपारी ३ पर्यंत पाथरी ४९.३५%  परभणी ४३.७४%  जिंतूर ५२.८६%  गंगाखेड ४३.९२%

५ पर्यंत पाथरी ६२.१९%  परभणी ५६.८४%  जिंतुर ६६.६५%  गंगाखेड ५९.८९% मतदान झाले हाेते.

यावेळी चार ही मतदार संघात मतदाना दरम्यान इव्हीएम मध्ये खराबी झाल्या मुळे त्या बदलाव्या लागल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली हाेती. तात्काळ प्रशासनाने मशिन उपलब्ध करून दिल्या.यात जिंतूर सीयू एक बीयू एक व्हिव्हिपॅट आठ ,परभणी सीयू २,बीयू२,व्हिव्हिपॅट ७,गंगाखेड सीयू२,बीयू२, व्हिव्हिपॅट १९,पाथरी सीयु १,बीयू १,  व्हिव्हिपॅट ७ बदलाव्या लागल्याची  माहिती निवडणुक सुत्रांनी दिली. आज पारपडलेल्या निवडणुकीत पाथरी विधानसभन मतदार संघातील आठ गावांनी संपुर्ण पणे बहिष्कार टाकला हाेता यात साेनपेठ तालुक्यातील गाेदा काठा वरील तब्बल सात गावांना रस्ता नसल्याने या ग्रामस्थांनी संपुर्ण पणे मतदानावर बहिष्कार टाकला आणि मतदानाची वेळ संपल्या नंतर फटाके फाेडून आनंद साजरा केला. तर पाथरी तालुक्यातील डाेंगरगाव  येथिल ग्रामस्थांनी पिकविमा आणि तीस वर्षा पासून गावला येण्या जाण्या साठी रस्ता नसल्याने मतदान प्रक्रियेवि पुर्ण पणे बहिष्कार टाकला हाेता. प्रशासनाने बहिष्कार मागे घेण्याची विनंती करून ही या गावातील नागरीक मतदान प्रक्रियेवरील बहिष्कारावर ठाम राहिले.

No comments:

Post a comment