तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

तुकडोजी महाराज यांनी साडेसात लाख खेड्यांचा अभ्यास केला-प्रविण पट्टेबहादूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नेहरू युवा मंडळाचे वतीने  अभिवादन

फुलचंद भगत
वाशिम -समाजीक कार्यात अग्रेसर असलेले ग्राम केकतउमरा येथील नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आज दिनांक11ऑक्टोबर रोजी स्मृतिदिनानिमित्त त्यांना नेहरू युवा मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सुरवातीला नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी मिळून त्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलतांना प्रविण पट्टेबहादूर म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी साडेसात लाख खेड्यांचा अभ्यास करून तेथील समस्या,अनुभव,प्रसंग यांची सांगड घालून नंतर त्यांनी ग्रामगीता लिहून त्या ग्रामगितेत याचा समावेश केला असल्याचे मत व्यक्त केले.पुढे बोलताना म्हणाले की, तुकडोजी महाराज यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी 1935 साली गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली आहे.एवढेच काय तर 1942 साली त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील सक्रिय सहभाग घेतला होता. म्हणून त्यांनी केवळ सामाजिकच कार्य केले नव्हे तर देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे संत म्हणजे तुकडोजी महाराज असल्याचे प्रतिपादन प्रविण पट्टेबहादूर यांनी केले. यावेळी अनेक जनांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी नेहरू युवा मंडळाचे प्रदिप पट्टेबहादूर,सागर पट्टेबहादूर,दिपक पट्टेबहादूर,सचिन कांबळे, विक्की पट्टेबहादूर इत्यादी अनेकजण यावेळी उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835
8459273206

No comments:

Post a Comment