तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

विकासापासुन कोसो दुर असलेल्या वाशिम मंगरूळपीर मतदारसंघात ऊमेदवारांकडुन भुलथापा(फुलचंद भगत)
वाशिम-आतापर्यत वाशिम मंगरूळपीर विधासभा मतदार संघाला निष्र्किय आणी जनतेचे देणेघेणे नसलेल्या लोकप्रतिनिधींची विकासाच्या बाबतीत अनास्थाच दिसुन आली असुन पुन्हा एकदा विधानसभा निवडणूकीला सामोरे जात असतांना मतदार राजाला नवनविन भुलथापा ऊमेदवारांकडुन दिल्या जात असल्याने कोणता झेंडा घेवू हाती?अशी काहीशी अवस्था इथल्या भाबड्या मतदारांची झाली आहे.
         निवडणूक म्हणले की चार दिवस मतदारांची जणू दिवाळीच.दारु,मटण,बाजारहाटासाठी शेपाचशे तसेच जेवणावळी बहूतांश ऊमेदवारांकडुन मतदारांना आकर्षीत करन्यासाठी पर्वणीच ठेवली जाते.यातच शिकलेल्या आणी थोडेफार जाणकार असलेल्या मतदारांना विविध आमीषेही देन्यात येत आहेत.निवडून आल्यावर हे करु,ते करु अशा कामांची यादीच वाचुन दाखवल्या जात आहे.कुणाला जातीपातींच्या राजकारणात गुंतवून ऊल्लु सरळ करन्याचा प्रयत्न तर कुणी तर आम्हीच मतदार संघाचा विकास करु शकतो असा ऊसना आव आनत आहेत.चारपाचशे रुपये देवून प्रचाराच्या आॅडिओ बनविन्याचे काम सुरु असुन प्रचारामधले मुद्दे ऐकुन तर आपला मतदारसंघ आता बारामतीच होणार अशी आशा मतदारांची पल्लवित केल्या जात आहे.विषेश म्हणजे वंचित कडे जे कार्यकर्ते घिरट्या मारतांना दिसत आहेत त्यामधलेच काही काॅग्रेसकडे,काही बसपाकडे,बिजेपी तर काही ईतर अपक्ष ऊमेदवारांच्या मागे लाळ घोटतांना दिसत असल्याचे पाहावयास मिळत असल्याने खर्चपाणी काढन्यासाठी "साहेब मी कट्टर तुमचाच कार्यकर्ता"असे ठासुन सांगन्यात येत आहे.
            मला गावचा सरपंच पोलिसपाटीलही माहीत नाही असे म्हणणारे ऊमेदवारही निवडणूक रिंगणात असुन खरच ते जनतेचा आणी मतदार संघाचा विकास करतील का?हा प्रश्नही मतदारांना पडलेला असुन,काहींनी पक्षात बंडाळी करत दुसरा झेंडा हाती धरल्याने मतदारांची मुकाट त्यांच्यामागे चालन्याची म्हणजेच मेंढरासारखी गत होईल का?हे बघणेही गरजेचे ठरणार आहेत.काही ऊमेदवार जातीच्या नावावर जोरदार प्रचारमोहीम सुरु करत असुन पुन्हा खुर्ची संपादन करन्यासाठीही प्रयत्नशिल असलेले दीसत आहेत.बौध्द जातीचा म्हणून ऊमेदवारी नाकारलेले ऊमेदवारही जनतेपुढे जातीचं राजकारण करतांना दिसत असल्याने ही निवडणूक विकासाची की जातीपातीच्या मुद्द्याची असा सभ्रमही होत आहे.आपले समर्थक ओळखुन ऊमेदवारांनी वेळीच सावध होवून जनहिताचे मूद्दे लोकांसमोर मांडतांना सध्या कुणी दिसत नसल्याने हा मतदार संघ ये रे माझ्या मागल्या....सारखीच गत होतांना दिसत आहे.कुणी ऊच्चशिक्षणाचाही आव आणत असुन आम्ही फार शिकलेले आहोत म्हणून आम्हीच तुमचे निवडुन आल्यावर भले करणार असे मतदारांना सांगतल्याशिवाय ऊमेदवार राहत नसल्याने एकंदरीत या परिस्थीतीचा आढावा घेत रखडलेला मतदार संघाचा विकास,औद्दोगिक प्रगती,कारखाने,युवकांना रोजगार,महिलांचे सरंक्षण व विकासात्मक दर्जा,कुषोषणाचा मुद्दा,मतदार संघाचा आर्थीक विकास,शेतकर्‍यासाठी विविध योजना आदी बाबीसाठी मनापासुन झटणारा आणी तळागाळातील लोकांना केंद्रस्थानी मानून काम करणारा ऊमेदवार जनता निवडणार असुन ईतर भुलथापांना आता मतदार निश्चीतच बळी पडणार नसल्याचे सुज्ञ आणी जाणकार राजकारणी बोलत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment