तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

परळीत भाजप महायुतीच्या अभूतपूर्व सभेने केले विजयावर शिक्कामोर्तब ! ; जे स्वत:च्या रक्ताच्या बहिणीचा सन्मान करत नाहीत ते सामान्य मुलींचा काय करणार, ना. पंकजाताई मुंडेंनी आक्रमक व आवेशपूर्ण भाषणातून राष्ट्रवादीचे काढले वाभाडे


माझं मेरिट जनता ठरवेल, तुमच्या सर्टीफिकेटची गरज नाही


प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्या बहिणीने  लहानपणापासून राखी बांधली त्या रक्ताच्या बहिणीबद्दल जाहीर सभेत अशोभनीय वक्तव्य करून तिचा अपमान करणारे  सामान्य मुलींचा काय सन्मान करतील असा सवाल करून माझं मेरिट तपासण्याचा यांना कोणी अधिकार दिला. जनता माझे मेरिट ठरवेल तुमच्या सर्टीफिकेटची गरज नाही अशा शब्दात भाजपा महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादी वर जोरदार हल्ला चढवला. हीन पातळीच्या राजकारणावरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली. आज झालेल्या समारोपाच्या  सभेस मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने राष्ट्रवादीला घाम फुटला आहे.

     भाजपा महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ प्रचाराच्या समारोपाची सभा राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे आयोजित करण्यात आली होती. सामान्य नागरीक आणि व्यापारी वर्गाला त्रास नको म्हणून ना. पंकजाताई मुंडे यांनी रॅली स्थगित करून सभा घेण्याचा निर्णय घेतला होता.

 यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांचे अतिशय आवेशपूर्ण व आक्रमक भाषण झाले, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, सध्या राजकारणाची पातळी अतिशय हीन झाली आहे. ज्या बहिणीने अगदी लहानपणापासून राखी बांधली त्या बहिणीबद्दल धनंजय मुंडे यांनी अतिशय अपमानित करणारे हातवारे करून लज्जास्पद वक्तव्य केले, त्यामुळे मी उद्विग्न झाले. मनात राजकारण सोडण्याचाही विचार आला पण लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी माझ्या स्वाधीन केलेल्या जनतेला मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. माझ्या आईबहिणींची काळजी घेण्यासाठी मी राजकारणात राहण्याचा निर्णय घेतला. माझी लढाई ही व्यक्ती विरोधात नसुन वृत्ती विरोधात आहे मात्र राष्ट्रवादीने ही लढाई केवळ माझ्याविरुद्ध लढली आहे. गोपीनाथ मुंडे हे नाव संपविण्यासाठी त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते बीड जिल्ह्यातच ठाण मांडून बसले आहेत.

माझं मेरिट जनता ठरवेल

तुम्ही गोपीनाथ मुंडे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा तुम्ही त्यांना सोडून गेलेत
माझं मिरीट तुम्ही काढताय ज्यांनी दहावीला ३६ टक्के मार्क घेतले आणि मी ८६ टक्के घेतले ते मला म्हणतात की तुमचे मिरीट नाही म्हणून, माझं मेरिट तपासण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ते जनता ठरवेल. धनंजय मुंडे यांनी पंडितगढ का उभा केला नाही?
काय गप्पा मारता तुम्ही साधा शेतकरी सुद्धा आपल्या बापाच्या समाधीला ग्रॅनाइटची ची फरशी लावतो, तेवढी तुम्ही तुमच्या वडिलांच्या समाधीला सुद्धा बांधली नाही असा टोला लगावला.  मी गुंडगिरी करीत नाही, दादागिरी करीत नाही, खोटे बोलत नाही, हीच माझी निष्क्रियता आहे. पण तुमचा पक्ष पाच आमदारावरून शुन्यावर आणला हे माझे मेरिट आहे असे ठणकावून सांगत स्त्रीचा अपमान करणार्‍यांचे कधीच चांगले होत नाही हा इतिहास आहे असे त्या म्हणाल्या.
      लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याबद्दल आता ते प्रेम दाखवत आहेत. पण पंडितअण्णा आणि गोपीनाथ मुंडे ही राम-लक्ष्मणाची जोडी कोणी फोडली असे विचारून राष्ट्रवादीवाले घर फोडण्याचे काम करतात मी मने जोडण्याचे काम करते असे सांगून दहशत निर्माण करणार्‍यांना आश्रय दिला तर ते तुमचेच नुकसान करतील असेही त्या म्हणाल्या.

खोट्या अफवा पसरवून माझी बदनामी

मी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करीत आहे. परळीच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे. मी तपस्वी सारखे काम करते, कुटुंबापेक्षाही जास्त वेळ जनतेसाठी देते तरीही माझ्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असे सांगून त्यांच्या पत्नीला अटक करण्यासाठी मी फोन केल्याचे खोटे सांगून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत पण मी प्रभू वैद्यनाथ आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते मी कधीच आणि कुणासाठीच पोलीसांना फोन केला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

  सभेचे संचलन अरूण पाठक यांनी केले तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डाॅ. अमित पालवे, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, यशःश्री मुंडे,  प्रा. टी पी मुंडे, माजी आमदार हरिभाऊ राठोड, राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शिवाजीराव गुट्टे, अशोक जैन, विनोद सामत, शालिनी कराड,  दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, प्रभारक वाघमोडे, मारोती मुंडे गुरूजी, निळकंठ चाटे, श्रीराम मुंडे, प्रा. विजय मुंडे, शिवाजी शिंदे, दासू वाघमारे, राजा पांडे आदींसह असंख्य कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी  व नाग

No comments:

Post a Comment