तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

आईस बाथ क्रिकेटपटूंसाठी लाभदायक ठरतेय               बाथ म्हणजे अंघोळ. शरीराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली ही बाब तशी आपल्यासाठी नित्याचीच. साध्या पाण्याने अंघोळ केल्यानेही आपण तरतरीत होतो. त्यामुळे अंघोळ ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.

अंघोळ, पाण्याची आवक व वातावरणाचा परिणाम यावर कधी, किती, कशी व केंव्हा करायची हे सर्वसामान्यांचं गणित अवलंबून असतं. 

                  परंतु विज्ञान जसं प्रगत गेलं तस तसे नवीन शोध लागत गेले.स्टिम बाथ ( वाफेची अंघोळ ), हॉट वॉटर बाथ ( गरम पाण्याची अंघोळ ), कोल्ड वॉटर बाथ ( थंड पाण्याची अंघोळ ) या सर्वांना माहिती असलेल्या अंघोळ करण्याच्या प्रथा आहेत. आता याच्याही पुढे जात आईस बाथ ही प्रथा आस्तित्वात आली. ही बर्फाने करायची आंघोळ नेमकी कोणी करायची ? का व कशी करायची ? हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यालाही लागली असेल. या बर्फाने केलेल्या अंघोळी पासून काय फायदे आहेत. हे सर्व आपण या लेखात जाणून घेऊया.

                  व्यायाम केल्यावर किंवा जास्त खेळून थकल्यावर खेळाडू 'आईस बाथ' करतात. 'आईस बाथ' घेतल्याने शरीरातील मांसपेशींना कमी नुकसान पोहोचते. त्याचबरोबर मांशपेशींचा विकास होण्यासाठी 'आईस बाथ' मुळे फायदाच होतो.

                  क्रिकेटपटू हे बऱ्याचवेळा बर्फाच्या पाण्यात अंघोळ करतात. खेळाडू थकून आले की ते आईस बाथ घेतात. बर्फाने भरलेला एक बाथटब ठेवलेला असतो, खेळाडू काही मिनिटे त्यामध्ये जाऊन आंघोळ करतात. ५ - १० मिनिटांची ही प्रक्रिया असते. सदर खेळाडूने जर एकदा का 'आईस बाथ' घेतली की तो ताजातवाना होतो. यामुळे त्याचे आखडेले स्नायू, दुखावलेल्या शिरा मोकळ्या होतात, त्याला आराम मिळतो व पुढील काम शिताफीने करू शकतो.  आईस बाथ घेताना त्याचं तापमान किती राखायचं हे  त्या दिवासाच्या वातावरणावर अवलंबून असतं. मैदानात थकलेला खेळाडू नियमानुसार १५ मिनिटापर्यंत मैदानाबाहेर थांबून इलाज - उपचार करू शकतो. बर्फाची अंघोळ करू शकतो. त्यानंतर बर्फाच्या पाण्याने धुतलेला ओलसर टि शर्ट घालून पुन्हा मैदानात जाऊन आपला जलवा दाखवू शकतो.

                  क्रिकेटपटूंव्यतिरीक्त अॅथेलॅटिक्समधील खेळाडूही आपले दुखावलेले स्नायू, मांसपेशी तंदुरुस्त ठेवण्यासाठी आईस बाथचा आधार घेतात. त्यामुळे त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यास मदत होते. बर्फ खेळाडूला चंचल ठेवण्यास मदत करतो. मात्र त्याचा वापर समजून उमजून शास्त्रीय पध्दतीने करणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे दुष्परीणामही गंभीर होऊ शकतात. त्यामुळे वरकरणी वरदान वाटणारी आईस बाथ शापही साबीत होऊ शकते.

             लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

         

No comments:

Post a Comment