तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

निवडणूक निरीक्षक निलय बरण सोम यांनी केली एम.सी.एम.सी कक्षाची पाहणीप्रतिनिधी
परभणी दि. 09 : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 करिता जिल्ह्यातील 95-परभणी व 96जिंतुर करिता नियुक्त खर्च निवडणूक निरीक्षक निलय बरण सोम किशन यांनी आज जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) कक्षास भेट देऊन या कक्षामार्फत होत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.

एम.सी.एम.सी. कक्षाची पाहणी करून श्री. सोम यांनी समाधान व्यक्त केले. 'पेड न्यूज व त्याबाबत ची कार्यवाही याबाबत विशेष लक्ष देण्याचीही गरज त्यांनी यावेळी व्यक केली.

 यावेळी   मीडिया केंद्र प्रमुख तथा एम.सी.एम.सी.सदस्य सचिव विकास माळी आणि एम.सी. एम .सी.सदस्य प्रा. वैभव पाठक व मीडिया सेंटर चे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment