तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

मतदार संघातील मुलभुत प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्यावी - डॉ. जगदिश शिंदे


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : पाथरी मतदार संघातील इतर तालुक्यांच्या तुलनेत विकासापासून कोसो दुर असलेला तालुका म्हणून सोनपेठ तालुक्याला पाहीले जाते या मतदार संघातील रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण यासह सर्वच मुलभुत प्रश्न सोडवण्यासाठी मला विधानसभेत संधी द्या असे अवाहन डॉ. जगदिश शिंदे यांनी केले.
पाथरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. जगदिश शिंदे यांनी आज विधानसभा निवडणूकीचे उमेदवार म्हणून सोनपेठ शहरातील विटारोड, आठवडी बाजार, मुख्यरस्ता, काबरा मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अहिल्याबाई होळकर चौक, गणेश नगर आदी सर्व भागात तसेच तालुक्यातील दुधगाव, वाणीसंगम, विटा, डिघोळ, खपाट पिंपरी, गवळी पिंपरी या सर्व गावांना भेटी देऊन प्रचार फेरी व मतदार संपर्क अभियान राबवले. त्यांनी मतदारांशी संपर्क साधताना मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मला विधानसभेत संधी द्या असे अवाहन केले. 
यावेळी कुणबी समाज संघटनेचे गोपीनाथ जाधव, पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष सतिश शिंदे, राजेश मोरे, रावसाहेब निकम, सतिश पौळ, दिलीप टेकाळे, ज्ञानेश्वर मोरे,  लखन टेकाळे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते. त्यांच्या या अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment