तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

ना. पंकजाताई च्या विजयासाठी प्रा .टी.पी. मुंडे मैदानात; झंझावती प्रचार दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार ना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या विजयासाठी भाजपाचे नेते प्रा. टी.पी. मुंडे सर मैदानात उतरले असून त्यांनी आज केलेल्या पहिल्याच प्रचार दौऱ्याला मतदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.


    भाजपा-शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज प्रा. टी.पी .मुंडे सर यांनी पुश जवळगाव बरदापुर या गावात व परिसरात मतदारांची कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधला व ना पंकजाताई गोपीनाथ राव मुंडे यांच्या विकासासाठी विजयाची गरज प्रतिपादित केली . "पुतणीच्या विजयासाठी काका प्रा. टी.पी. मुंडे सर" मैदानात उतरल्याने गावागावात या प्रचार रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.


   भाजपाचे दिवंगत नेते स्व गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत काही ज्येष्ठ मतदार प्रा .टी.पी .मुंडे सर यांची भेट घेतात गहिवरून येत असल्याचे चित्र दिसून आले.


    या प्रचार दौऱ्यात भाजपाचे नेते प्रा. टी.पी .मुंडे सर यांच्यासह भाजपाचे जि प सदस्य अविनाश मोरे ,ज्येष्ठ नेते कल्याणराव भगत, रफिक भाई कुरेशी ,रशीद पठाण, शेरकु भाई, रोप भाई, सतिष भांडे , माऊली औताडे, अनिल औताडे ,नितीन हारे , कुंडलिक गव्हाणे , बालाजी कांबळे , रामराव गीते , दिलीप गीते , कार्तिक हारे  ,गोपीनाथ हारे ,  पदम  काळम,  मोहन हारे ,  लक्ष्मण हारे, सतीश हारे, बाळासाहेब देशमुख, मनोज धोतरे ,महादेव धोतरे , मंचक ढवारे आदीसह भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    दुपारच्या सत्रात झालेल्या या प्रचार दौऱ्याला मतदारांकडून गावोगावी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या निवडणुकीत भाजपा शिवसेना रिपाई महायुती च्या उमेदवार ना पंकजाताई गोपीनाथ राव मुंडे यांनाच विजयी करणार असल्याचे अभिवचन मतदारांनी प्रा .टी.पी .मुंडे सर यांना दिले. सायंकाळच्या सत्रात गुट्टेवाडी सौंदाना या गावांना भेटी देऊन मतदारांची संवाद साधला व दैठणा घाट व खोडवा सावरगाव येथे झालेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून भाजपचे नेते प्रा. टी.पी .मुंडे सर यांनी शेतकरी शेतमजूर वन्य वंचित घटकांच्या विकासासाठी ना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment