तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

पाथरी विधानसभेच्या बहुरंगी लढतीत अपक्षांचे प्रस्थापितांना आव्हान.प्रतिनिधी
पाथरी:-विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली असून प्राथमिक टप्यात कार्यकर्त्यांची फळी एकत्र करून सर्वच उमेदवार प्रचार कामाला लागले असून प्रचार रथांच्या माध्यमातून गावागावात पोहचून प्रत्येक जन मतदार संघाच्या विकासाचा अजेंडा ठेवत आहे.येथील लढत ही दुरंगी होईल असा अंदाज असतांना प्रस्थापित नेत्यांना अपक्षांनी प्रचारात आघाडी घेत जबरदस्त आव्हान दिले असल्या चित्र निवडणुकीच्या पहिल्याच टप्यात दिसून येत आहे.

पाथरी विधानसभा मतदार संघात गतवेळी आघाडी आणि युती वेगवेगळे लढले होते.त्या वेळी ही भल्याभल्यांच्या अंदाजांना चकवा देत दोन विद्यमान आमदार, एक माजी मंत्री आणि एका माजी आमदाराला परभावाची चव चाखवत पाथरी मतदार संघातील जनतेने अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात उतरलेल्या विद्यमान आ मोहन फड यांना १३ हजारावर मतांनी विजयी केले होते. या नंतर आ फड यांनी शिवसेना,भाजपा, रिपाई असा राजकीय प्रवास करत या वेळी आरोग्य,शेत रस्ते, मानवत शहरातील कामे यावर काम केल्याचे दाखवत पुन्हा निवडणुक रिंगणात भाजपाचे कमळ घेऊन उतरले आहेत.मात्र गतवेळी त्यांच्या विजयात ज्या शिलेदारांचा सहभाग होता ते या वेळी प्रचारात दिसत नाहीत तर भाजपाची जुनी मंडळी ही हात झटकून असल्याचे चित्र दिसत आहे.तर महायुतीचे उमेदवार असतां नाही एक दोन पदाधिकारी वगळता शिवसेना सर्व ताकदीनिशी प्रचारात दिसत नाही.

यावेळी आघाडी कडून काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर निवडणुक रिंगणात आहेत. वरपुडकरां सोबत राकाँची ताकद आहे. स्वत:  वरपुडकर हे राकाँ कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेऊन जि प गट, पं स गणातील गावा गावात एकत्र प्रचार करत आहेत. तीन,चार वेळा आमदार एकदा राज्यमंत्री अशी अनुभवाची शिदोरी वरपुडकर यांच्या कडे असून त्या बळावरच ते निवडणुक रिंगणात असून वरपुडकर यांचा पुर्ण परिवार प्रचार कामात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर आ बाबाजानी दुर्रानी आणि उमेदवार वरपुडकर यांनी आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत प्रचाराचे नियोजन केले आहे. 

यावेळी लोकसभे प्रमाणे वंचित चा फॅक्टर प्रचाराच्या पहिल्या टप्यात तरी दिसत नाही.या नंतर होणा-या  सभां मधून अजून काय स्थिती राहील हे समजून येइल. गतवेळी निवडणुकीत सहा हजार मते घेतलेले विलास बाबर हे या वेळी वंचित चे उमेदवार आहेत.

या मतदार संघात सरळ लढत होईल असे वाटत असतांनाच शिवसेने कडून उमेदवारी न मिळाल्याने समाजसेवक, निराधारांचे आधार म्हणून ख्याती मिळवलेले डॉ जगदीश शिंदे यांनी भुमीपुत्र म्हणत अपक्ष उमेवारी दाखल करत नियोजनबद्ध प्रचाराला सुरूवात केली आहे. डॉ शिंदे यांना गावागावातून युवक,शेतकरी,कष्टकरी हे भुमीपूत्र उमेदवार म्हणून मोठे पाठबळ देत असल्याचे चित्र गावागावात होणा-या  कॉर्नर सभांना होणा-या  गर्दी तून दिसून येत आहे. ढोल ताशे लाऊन या भुमीपूत्र उमेदवाराचे युवक स्वागत करतांना दिसत आहेत. याविषयी डॉ शिंदे म्हणतात मतं किती मिळतील आणि निकाल काय लागेल माहिती नाही.पण इथल्या युवकांनी, अबालवृद्धांनी, महिलांनी जो प्रेमाचा वर्षाव केला तो अगदी भाराऊन टाकणारा आहे.हे सर्व शब्दात वर्णन न करता येणार असून, माझ्यात हिम्मत आहे तो पर्यंत समाजा साठी पुढे चालत राहिल-लढतही  राहील परीवर्तनांची नांदी येईलच या आत्मविश्वासाने ते मतदार संघात पहिल्या टप्यात प्रचारात दिसून येत असल्याने आणि गेली दहा वर्षा पासून कुठलेही पद नसतांना गावागावात गोरगरीबांशी जोडले गेले असल्याने प्रचारात डॉ जगदीश शिंदे यांनी चांगलीच आघाडी घेतलेली दिसून येत आहे. युवा,नवखा, कोरीपाटी असे म्हणत युवक प्रचार कामात अग्रभागी दिसत आहेत.त्या मुळे सुरूवातीला दुरंगी वाटणारी पाथरी विधानसभा मतदार संघाची निवडणुक डॉ जगदीश शिंदे यांच्या प्रचारातील आघाडी मुळे चांगलीच रंगतदार होणार असल्याने प्रस्थापित नेत्यांना कडवे आव्हान असल्याचे चित्र प्रचाराच्या पहिल्याच टप्यात दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment