तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

भाजपमध्ये इनकंमिंग सुरूच,खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.०६----परळी मतदार संघात भारतीय जनता पक्षात जोरदार इनकंमिंग सुरु असून राज्याच्या ग्रामविकास मंत्री व महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांनी पाच वर्षात मतदार संघाचा न भूतो स्वरूपाचा अफाट विकास व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची संवेदनशीलतेने केलेल्या सोडवनुकीने मतदार संघातील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.काल ( दि.०६ ) खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांनी ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला.

राज्याच्या ग्रामविकास महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी परळी मतदार संघातील डाबी तांडा,बहादूरवाडी,नागपिंपरी,जिगा नाईक तांडा,अस्वलअंबा, वाण टाकळी, वाण टाकळी तांडा,दौनापुर,नागापूर,डाबी येथे मतदारांशी संवाद साधला.याप्रसंगी मतदारांना संबोधित करताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या “ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेली अभूतपूर्व विकास कामे व जनतेचा उत्फुर्त प्रतिसाद उद्याच्या ऐतिहासिक विजयाची नांदी असून पंकजाताईंच्या विजयात आपले योगदान द्या.यापूर्वी त्याप्रमाणात कामे केली आहेत त्याच प्रमाणात येणाऱ्या काळातही विकास कामे करून मतदार संघातील प्रत्येकाला अभिमान वाटेल असे कार्य ना.पंकजाताई मुंडे करणार आहेत.

दरम्यान डाबी तांडा,वाण टाकळी, वाण टाकळी तांडा,दौनापूर,डाबी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.तर परळी येथे यश:श्री निवासस्थानी कौडगाव घोडा अंतर्गत येणाऱ्या नाईक नगर तांडा,चव्हाण तांडा व वसंतपुर कानडी तांडा येथील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी प्रवेश केल्याने भाजपमध्ये जोरदार इनकंमिंग सुरु असून राष्ट्रवादीची आऊटगोईंग थांबत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

No comments:

Post a comment