तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 October 2019

डॉ शिंदेंना विजयी करा;पाेहरादेवी संस्थानच्या मुख्य महंतांचे आवाहन
प्रतिनिधी
पाथरी:-बंजारा समाजाचे आराध्यदैवत श्री जगदंबा माता,तपस्वी डॉ श्री रामराव महाराज यांच्या आशिर्वादाने पाेहरादेवी संस्थानचे मुख्य महंत श्री बाबूसिंग महाराज यांनी पाथरी विधानसभा मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून आेळख असलेले अपक्ष उमेदवार डॉ जगदीश शिंदे यांना मतदान करून बंजारा समाजाच्या प्रगतीची चावी फिरवण्याचे आवाहन केले आहे.
डॉ जगदीश शिंदे यांना दिवसें दिवस समाजातील सर्व स्तरातून पाठबळ मिळतांना दिसत आहे.पाेहरादेवी संस्थानचे मुख्य महंत यांनी नुकतीच येथील आेंकार वृद्धाश्रमाला भेट दिली त्या नंतर साेमवार १४ ऑक्टाेबर राेजी एका व्हिडिआे व्दारे बंजारा समाजाने समाजा साठी काम करणारा हा युवकच बंजारा समाजाच्या प्रगतीची चावी ऊघडेल असे आवाहान करत संपुर्ण बंजारा समाजाने डॉ जगदीश शिंदे यांच्या पाठिशी उभे राहाण्याचे आवाहन या व्हिडिआेच्या माध्यमातून केले आहे. पाेहरादेवीच्या महतांनी पाठिंबा दिल्याने डॉ शिंदे यांनी महाराजांचे आणि बंजारा समाजाचे आभार व्यक्त करत मी सर्वां साठी दिवस रात्र मेहनत करून मतदार संघाचा काया पालट करण्यास कटीबद्ध असल्याचे सांगुन सर्व ठिकाणा हून मला गावी येण्याचे निमंत्रण येत असून मी प्रयत्न करताेय रात्री उशिरा पर्यंत माझ्या माय माऊल्यांचा आशिर्वाद घेताे,बंधू,भगिनींचे पाठबळ मिळत आहे.सर्व मित्रपरीवार सामाजिक कार्यकर्ते माझ्या साठी तळमळीने काम करत आहेत. मी वचन देताे की मी या कठीण काळात मी जरी तुमच्या पर्यंत पाेहचू शकलाे नाही तरी मी पुढील काळात निवडून आल्यावर शंभर दिवसात तुमच्या सर्व समस्या साेडवण्या साठी प्रत्येक गावात येणार असल्याचे डॉ शिंदे म्हणाले.

No comments:

Post a comment