तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

कॉपी बहाद्दर भाजपाला स्वतःचा जाहीरनामा ही करता आला नाही; राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील मुद्दांचीच केली चोरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणूकीच्या संपूर्ण प्रचार कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या मुद्दांची कॉपी करणार्‍या भाजपाला स्वतःचा स्वतंत्र जाहीरनामा ही करता आला नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दांचीच त्यांनी चोरी केल्याचे उघड झाल्याने परळीकरांमध्ये भाजपाचे चांगलेच हसे होत आहे.

निवडणूकीच्या पहिल्या दिवशी पासून धनंजय मुंडे यांनी परळीत आघाडी घेतल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. सत्ता असतानाही पाच वर्षात कोणतेही सांगण्या सारखे काम नसल्याने जनतेसमोर कोणते तोंड घेवून जावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. याच उद्विग्न माणसिकतेतून राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील जवळपास सगळेच मुद्दे भाजपने कॉपी-पेस्ट केल्याचे दिसून येत आहे.

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा असो किंवा परळी शहर स्मार्ट सिटी करण्याचा विषय असो किंवा परळी रेल्वे स्थानकाचा विषय असो, शेती पासून ते ई-लर्नींग पर्यंत भाजपाच्या जाहीरनाम्यातील सर्वच मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून चोरून कॉपी केलेले दिसून येत आहेत.

प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक बाबीत कॉपी करणार्‍या पंकजाताईंनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने अत्यंत खालच्या पातळीवर जावून टीका केली, सर्व शक्ती पणाला लावली अगदी उदयन राजें पासून नरेंद्र मोदी पर्यंत सर्वांना परळीत प्रचाराला आणले तरी ही धनंजय मुंडेंच्या लोकप्रियतेला घटवू न शकल्याने आता प्रत्येक मुद्दा चोरून कॉपी-पेस्ट करण्याची वेळ ताईंवर आली असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a comment