तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

संताच्या संगतीमध्ये दुःखाचा नाश होतो- बालयोगी ह.भ.प. दिवेगांवकर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.07........... स्व.पंडीतअण्णा मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भागवत कथेचा चौथ्या दिवशाचे पुष्प गुंफथाना कथेचे प्रवक्ते बालयोगी राष्ट्रसंत ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगांवकर यांनी अनेक संतांच्या कथा सांगतांना साधुच्या संगतीमध्ये दुःखाचा नाश होवून सुखाची प्राप्ती होते असे सांगितले.

या प्रसंगी त्यांनी ध्रुवबाळ, प्रथुराजा, जडभरत राजा, आजामेळा, दत्तप्रभु, भक्त प्रल्हाद यांच्या कथा सुरस सांगितल्या. दैत्यांच्या कुळामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म झाला पण नारदा सारख्या साधुची संगत लाभल्याने प्रल्हादासारखा भक्त हिरण्यकशपुच्या घरी जन्माला आला. आजामेळासारख्या पाप्याच्या घरी एक रात्र नामासंगकिर्तन केल्याने एका रात्रीत आजामेळासारख्या पाप्याचा उध्दार संतांनी केला. देशाच्या पाठीवर माझ्या भारतासारखा व महाराष्ट्रासारखे संतांच्या पादस्पर्शाची दुसरी पावनभूमी नाही. एकादशीचे व्रत सांगताना अंबरीश ऋषींची कथा सांगितली. या संतावर आलेली सर्व संकटे व शाप स्वतः भगवंतांनी स्वीकारले व अंबरीश ऋषीचा उध्दार केला.

आजच्या कथेच्या शेवटी धनंजय मुंडे यांचे लहान बंधू अभय मुंडे व त्यांच्या सौभाग्यवती सोनाली मुंडे यांच्या हस्ते कथेची आरती झाली. यावेळी परळी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment