तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

अभिनव विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सहशिक्षक सचिन सोमवंशी व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली प्रमुख पाहुणे सूर्यकांत कातकडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांबद्दल माहिती दिली भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रकाश गित्ते यांनी केले या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व व शिक्षक वृंद उपस्थित होते

No comments:

Post a Comment