तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 October 2019

पोहनेरच्या मोरया प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश ; ना. पंकजाताई मुंडे यांच्या मताधिक्यसाठी करणार प्रयत्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     पोहनेर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मोरया प्रतिष्ठानच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानल्या जात आहे. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
     पोहनेर येथे मोरया प्रतिष्ठानचे चांगले काम असुन या माध्यमातून युवक अनेक उपक्रम राबवित असतात. यशश्री निवासस्थानी एका कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुधाकर पौळ यांच्या नेतृत्वाखाली संतोष गरड, सागर देशमुख, संतोष देशमुख, जलिलमियां कुरेशी, राजेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर देशमुख, मधुकर काकडे आदींच्या उपस्थितीत अनिल काकडे, नितीन काकडे, दिपक देशमुख, अनिकेत देशमुख, रवि गोरे, सुरज पांचाळ, आकाश लाकडे, राहुल काकडे, रामेश्वर लाकडे, बालाजी काळे, लिंबाजी काकडे, हनुमान पौळ आदी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. 
     ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सर्व युवकांनी दिली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment