तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 23 October 2019

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 टेबल
. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात
बुलडाणा, दि. 23: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या मतामोजणी दि. 24 ऑक्टोंबर 2019 रोजी होणार आहे. मतमोजणीकरीता प्रशासन सज्ज झाले असून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीकरीता संबंधित विधानसभा मतदारसंघातील  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  तयारी पूर्ण केली आहे.
    मलकापूर विधानसभा मतदार संघांची मतमोजणी कृषि उत्पन्न बाजार समिती बेलाड फाटा, बुलडाणा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली विधानसभा क्षेत्रामध्ये तालुका क्रीडा संकुल, सिंदखेड राजा  येथे जिल्हा मार्केटींग अधिकारी गोदाम सहकार विद्यामंदीराजवळ, मेहकर येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम डोणगांव रोड, खामगांव येथे मातोश्री जयाबेन जिवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदीर आणि जळगांव जामोद येथे शासकीय धान्य गोदाम याठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
   असे राहणार टेबल व मतमोजणीच्या फेऱ्या
21- मलकापूर टेबल 14 फेऱ्या 22, 22- बुलडाणा टेबल 14 फेऱ्या 24, 23- चिखली टेबल 14 व फेऱ्या 23, 14- सिंदखेड राजा टेबल 14 व फेऱ्या 22, 25- मेहकर टेबल 14 व फेऱ्या 24, 26- खामगांव टेबल 14 व फेऱ्या 23 आणि जळगांव जामोद टेबल 14 व फेऱ्या 23 होणार आहे.

No comments:

Post a comment