तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

धनंजय मुंडेंची आज पट्टीवडगाव, सुभाष चौक, बरकतनगर भागात सभापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.12...........  परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे हे उद्या अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव तसेच परळी शहरातील सुभाष चौक, बरकतनगर येथे जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधणार आहेत.

सकाळी 09 वा. त्यांची पट्टीवडगाव येथे जाहीर सभा होणार असून, सायंकाळी 06 वा. सुभाष चौक येथे तर रात्रौ 08 वा. बरकतनगर येथे सभा होणार आहे. या सभेस माजी मंत्री पंडीतराव दौंड, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, जि.प.सदस्य संजयभाऊ दौंड, दत्ताआबा पाटील, राजेश्वरआबा चव्हाण, गोविंदराव देशमुख, अ‍ॅड.गोविंदराव फड, उजणीचे ज्येष्ठ चंदु गायकवाड, सोपान तोंडे, सत्यजीत सिरसाट, विश्वंभर फड, बालासाहेब माले, काशिनाथ यादव, सभापती सौ.मिनाताई भताने, बबन मुंडे, चंद्रकांत चाटे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

परळी येथील सभेस आघाडी व मित्र पक्षाचे सर्व स्थानिक नेते मंडळी उपस्थित राहणार असून, या सभेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment