तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

नागापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्तेंचा ; प्रा. टी.पी .मुंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
नागापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपाचे नेते प्रा. टी.पी .मुंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितत व ना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला.


भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार ना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करून त्यांना मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास कार्यकर्त्यांनी प्रा .टी.पी .मुंडे सर यांना दिला या प्रवेशाच्या दरम्यान भाजपचे युवक नेते तथा मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे,  ,ज्येष्ठ नेते संदिपान मुंडे, माणिक बनसोडे , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

नागापूर येथील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन माणिक रामभाऊ सोळंके, मोती बापू सोळंके, बाळासाहेब गिरी, सुधाकर गायके, अनिस युनूस अन्सारी, विश्वंभर सौंदडे महाराज, राजाभाऊ गंगणे ,रत्नाकर सोळंके आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

No comments:

Post a Comment