तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

अजय मुंडेंची सेलू, सबदराबाद, वडखेल मध्ये प्रचार फेरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी सेलू, सबदराबाद, वडखेलल मध्ये डोअर टू डोअर जावून प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला.
       राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी आज शुक्रवार दि.11 ऑक्टोबर रोजी वडखेल येथे डोअर टू डोअर असा संपर्क दौरा करून मतदारांशी संवाद साधला.        
             यावेळी गावातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व धनुभाऊ ला विजयी करणार असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

यावेळी त्यांच्या समवेत पं.स.सदस्य वसंतराव तिडके, वसंतराव गित्ते, पद्माकर शिंदे, नवनाथ गर्जे, भागवतराव गित्ते, रत्नाकर मुंडे, अतुल मुंडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment