तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

युवानेते नीरज देशमुख भाजपाच्या वाटेवरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते नीरज रावसाहेब देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इमाने इतबारे काम करुनही पक्षाकडुन कुठल्याही प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याने हा निर्णय घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
 परळी शहरातील नेहरु चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नीरज रावसाहेब देशमुख हे मागील अनेक वर्षांपासुन राष्ट्रवादीचे कार्य करत आहेत.प्रत्येक निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवारास विजयी करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे परंतु पक्षनेतृत्वाला माझ्या या पक्षकार्याची कुठलीही गरज उरलेली नसल्याने मी माझ्या कार्यकर्त्यांसह लवकरच भाजपा त प्रवेश करण्यात येणार असल्याचे नीरज देशमुख यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a comment