तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच स्वाभिमान प्राप्त झाला-प्रविण पट्टेबहादूर

 प्रवर्तन दिन सोहळा

फुलचंद भगत
वाशिम-भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायी यांच्यासह परिवर्तनवादी तथागत गौतम बुद्धांचा धम्म नागपूर येथील दिक्षाभूमीवर 1956 साली  धम्मदिक्षा घेऊन तमाम अनुयायी यांना परिवर्तनाच्या वाटेवर आणले.आणि आपल्यातील स्वाभिमान जिवंत करण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे मत 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. पुढे बोलतांना म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर अनेक धर्माचा अभ्यास केला. त्यावेळी अनेक धर्मातील लोकांना वाटत होते की,डॉ बाबासाहेब आंबेडकर आपला धर्म स्वीकारतील मात्र दुसऱ्या कोणत्याही धर्माला बळी नपडता बौद्ध धर्माचा स्विकार करून आपल्या लाखो अनुयायाला परिवर्तनाच्या वाटेवर आणले असल्याचे वैचारिक मत प्रविण पट्टेबहादूर यांनी व्यक्त केले.यावेळी असंख्य बौद्ध अनुयायी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment