तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

आंबेडकरी विचार संपविणार्‍या भाजपाला पराभूत करा- बाबुराव पोटभरेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.10.............. भाजपाला या देशातील घटना बदलायची आहे, आंबेडकरी विचार संपवून टाकायचा आहे, त्यामुळे आंबेडकरी जनतेने सावध होण्याची वेळ आली असून, आंबेडकरी विचार संपविणार्‍या भाजपाला या निवडणूकीत पराभूत करा असे आवाहन बहुजन विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ आज त्यांनी शहरातील भिमवाडी, सिध्दार्थनगर, भिमनगर, इंदिरानगर, पंचशिलनगर, आंबेडकरनगर, अशोकनगर आदी भागातील मतदरांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत माधवराव ताटे, श्रीहरी मोरे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, महेंद्र रोडे, अनंत इंगळे, दत्ताभाऊ सावंत, राजन वाघमारे, रवि मुळे, माधव रोडे, प्रा.शाम दासूद, विठ्ठलराव आदोडे, राज हजारे, गंगाधर वाघमारे, फुलचंद गायकवाड, बजरंग आदोडे, भारत ताटे, अशोक जगतकर, राहूल जगतकर, अमर रोडे, राज जगतकर, संतोष घोडके, रतन आदोडे, बबलू साळवे, विजय आटकोरे, संकेत दहिवडे, सुलभाताई साळवे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना बाबुराव पोटभरे यांनी धनंजय मुंडे हे आंबेडकरवादी विचारांचे कार्यकर्ते असून, सभागृहात जय भिमचा नारा बुलंद करणारा हा एक सच्चा कार्यकर्ता आहे. आंबेडकरवादी विचार कायम ठेवण्यासाठी आणि समाजाचा खर्‍या अर्थाने विचार करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समाजाने आपली शक्ती उभी करावी, असे आवाहन बाबुराव पोटभरे यांनी केले.

No comments:

Post a comment