तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

विकासाचे कोणतेच काम सांगण्यासाठी नसल्याने पंकजाताई माझ्यावर टिका करत आहेत- धनंजय मुंडे

मांडेखेलचे भाजपा नेते भिमराव मुंडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.11................ 5 वर्ष 4 खात्यांचे मंत्री राहूनही सांगण्यासारखे कोणतेच विकास काम केलेले नसल्याने भाजपा उमेदवार पंकजाताई माझ्यावर फक्त टिका करण्याचे काम करत आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्यावर बोलावे असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

तालुक्यातील मांडेखेल येथील भाजपचे ज्येष्ठ नेते भिमराव मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री पंडीतराव दौंड, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, कॉ.नागरगोजे सर, माऊलीतात्या गडदे, बबनदादा फड, अजय मुंडे, भानुदासराव डिघोळे, मोहनराव सोळंके, विष्णुपंत देशमुख, सोपान नागरगोजे, बळीराम बापु आघाव, महादेव मुळे, राहुल मुंडे, रखमाजी ढाकणे, यशवंतराव भोसले, आदींसह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

परळी विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत केवळ भावनेचे राजकारण झाले आहे, मात्र आता फक्त विकासाचे राजकारण होणार आहे. आपल्या मतदारसंघात निधी मंजूर झाल्याचा केवळ बोर्ड दिसतात विकास मात्र काहीच दिसत नाही, असा टोला लगावताना परळीसाठी मी एक स्वप्न पाहिले आहे, कोरडवाहू शेतकर्‍यांना मला बागायतदार बनवायचे आहे, साठवण तलाव बनवायचे आहेत, इथल्या तरूणांना रोजगार द्यायचे आहेत, तुमच्या मदतीने मी ते पूर्ण करणार आहे. स्व.अण्णा म्हणायचे लोकांचा विश्वास संपादन कर आज मी तो विश्वास संपादीत केला आहे, त्याचे रूपांतर मतात करून द्या असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

No comments:

Post a comment