तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करा-प्रविण पट्टेबहादूरमतदान जनजागृती रैलीतुन जनतेला संदेश

फुलचंद भगत
वाशिम - येथून जवळच असलेल्या ग्राम बाभूळगाव येथे दिनांक 5आक्टोबर रोजी सरस्वती समाजकार्य महाविद्यालय बि एस डब्लू भाग दोनच्या विद्यार्थी यांचे ग्रामिण क्षेत्रकार्य अंतर्गत व अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून या गावाची सखोल माहिती घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असताना प्रविण पट्टेबहादूर म्हणाले की,"एक व्यक्ती,एक मत"याचा आपण योग्य उपयोग करून आपण आपला हक्क बजावला पाहिजे.मतदान हे आपण केलेच पाहिजे.ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.मतदान मोठया प्रमाणात करून या देशाची लोकशाही आपण अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत नेहरू युवा बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी व्यक्त करून तमाम जनतेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भावनिक आवाहन केले आहे.या कार्यक्रमाला कौटुंबिक हिंसाचार सल्ला मार्गदर्शन केंद्राचे समुपदेशक प्रभू कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी मंचावर गांवचे सरपंच,उपसरपंच,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते. यावेळी सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या विध्यार्थी व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांनी मतदान जनजागृती रैली काढण्यात आली. या रैलीत वैभव ठोकळ,गंगाधर बांगर,अक्षय भिसे,धम्मपाल दिपके,आकाश वाझुळकर,सोनू हरीमकर,प्रदिप शिंदे,ददिपक खिल्लारे,प्रितम अंभोरे,सुरज अंभोरे,पूनम सोनुने,शीतल सावळे,नैना घबडघाव,गौतम धबाले,विश्वजित पट्टेबहादूर यांचेसह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment