तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

सातपुड्याच्या कुशीतही निनादला 'गो व्होट' चा आवाज..


भिंगारा गावात मतदान जनजागृती
बुलडाणा, दि. 11 : सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत  भिंगारा येथे आदिवासी बांधवांमध्येमतदान जनजागृती करण्यात आली. या गावातही 'गो व्होट' चा आवाज निनादला. आदिवासी बहुल व दुर्गम असलेल्या भिंगारा गावात पंचायत समिती प्रशासन, जळगांव जामोद गटविकास अधिकारी श्री. भारसाकळे व त्यांच्या चमुने मतदान जनजागृती केली.
   मतदान जनजागृती मोहीम संपूर्ण जळगांव जामोद मतदारसंघात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत रॅली द्वारे व घरोघरी जावून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  रॅली व घरोघरी मतदारांना संपर्क करण्यासाठी ग्रामसेवक, शिक्षक, विद्यार्थी , अंगणवाडी सेविका यांचा मोलाचा सहभाग होता.  आदिवासी भगिनी व बांधवांमध्ये  यावेळी मतदान जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमार्फत  ग्राम भिंगारा या गावातील मुख्य चौकात पथनाट्य  सादरीकरण करून मतदारांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले. विशेष म्हणजे ग्राम भिंगारा येथील बोलीभाषेत विद्यार्थ्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment