तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

मुस्लिम युवा समाज बांधवाच्या वतिने धम्म परिवर्तन दिन साजरा.


डोणगाव :-
 मुस्लिम समाज बांधवाच्या वतिने डाँ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण   करून धम्म परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.
डोणगांव येथे सामाजिक सलोखा कायम ठेवुन मुस्लिम बांधव यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर. व तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करण्यात आले. 
यावेळी सरपंच जुबेरभाई खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेहकर तालुका कार्याध्यक्ष यासीन बेग, सद्दाम शाह, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष यासीन कुरेशी, हमीद मुल्लाजी, जुबेरभाई कुरेशी, सलीम शाह,जहीर कुरेशी, जुबेरोद्दिन आदि युवक उपस्थित होते

No comments:

Post a comment