तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 October 2019

घनदाट मामा यांचा मतदारांच्या गाठीभेटीवर भर

अरुणा शर्मा


पालम :- गंगाखेड विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार मा.आ. सिताराम घनदाट मामा यांनी मतदार संघांतील गावागावोमध्ये जावून मतदारांशी प्रत्यक्ष भेट देवून संवाद साधत आहेत. संवाद भेटीमध्ये ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गंगाखेड विधानसभेचे अपक्ष उमेदवार घनदाट मामा यांनी मागील आनेक वर्षापासून समाजसेवेच्या माध्ययातून गावांतील शेतकरी, कष्टकरी,युवकांशी संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शहरासह ग्रामीण भागात स्वत: जावून मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. त्या सोडविण्याचे आश्वासन ते ग्रामस्थांना देत आहेत.मा.आ. सिताराम घनदाट यांच्या संवाद भेटी दरम्यान गावागावांमध्ये ग्रामस्थांची गर्दी होताना दिसून येत आहे.

No comments:

Post a comment