तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

ऐतिहासिक दसरा मेळाव्या निमित्त खा.प्रितमताई मुंडे यांची गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅली ; परंपरागत भव्य दिव्य रॅलीमध्ये असणार हजारोंचा सहभाग




परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) :- दि.०७-----दसरा मेळाव्या निमित्त खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड अशी भव्य दिव्य रॅली निघणार असून ऐतिहासिक दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी हजारोंचा सहभाग या रॅलीमध्ये असणार आहे.ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे.

दसरा मेळाव्या निमित्त दरवर्षीच्या परंपरेनुसार गोपीनाथगड ते भगवानभक्ती गड अशी भव्य दिव्य रॅली खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघणार असून गोपीनाथगड येथून सकाळी ०६.३० मिनिटांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार आहे.दसरा मेळाव्या निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर सावरगाव घाट येथे उपस्थित राहणार आहेत.

ऐतिहासिक दसरा मेळाव्या निमित्त निघणाऱ्या अभूतपूर्व रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने लोक आपली चारचाकी वाहने घेऊन सहभागी होणार असून आपली परंपरा आपली प्रथा भक्तीच्या शक्तीची यशोगाथा व्यक्त करणाऱ्या अभूतपूर्व रॅलीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे. खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघणारी रॅली गोपीनाथ गड,सिरसाळा,तेलगाव,वडवणी,बीड,वंजारवाडी,नायगाव,चुंबळी फाटा,वांजरा फाटा,कुसळंब मार्गे भगवान भक्तीगड सावरगाव घाट अशी निघणार आहे.

No comments:

Post a Comment