तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

त्यांनी मृत गायी वाटप केल्या आम्ही खर्‍या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करू- सौ.राजश्रीताई मुंडे जयगाव, पाडोळी, हसनाबाद येथील मतदारांशी साधला संवाद
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.09.............. प्रचारानिमित्त मी ज्या ही गावात जात आहे, त्याठिकाणी गावातील महिलाही बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगात सक्रीय झाल्याचे पहाण्यास मिळत आहे. या महिला बचत गटांचे अधिक सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी धनंजय मुंडे हे आगामी काळात विशेष प्रयत्न करणार आहेत, त्यासाठी त्यांना मतदानरूपी आशीर्वाद द्या असे आवाहन सौ.राजश्रीताई मुंडे यांनी केले आहे. महिला आमदार म्हणून ज्यांनी महिलांसाठी विशेष काम करण्याची आवश्यकता होती, त्यांनी केले काय ? तर फक्त निवडणूकीच्या तोंडावर कर्जाने गायी दिल्या आणि दिलेल्या गायीही मृत निघाल्या असा टोला त्यांनी नाव घेता पंकजाताई यांना लगावला.

परळी तालुक्यातील जयगाव, पाडोळी, हसनाबाद येथील महिला मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत भाऊसाहेब नायबळ, भाऊसाहेब नायबळ, राजाभाऊ पौळ, प्रभाकर पौळ, मोहनराव बडे, रूस्तुमबप्पा सलगर आदींसह गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

मतदारसंघातील सर्व महिला बचत गटांची एकत्रित संस्था करून बचत गट भवनाची निर्मिती, त्यांच्या मालाची विक्री-खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न, बचतगटांना कंपन्यांच्या सी.एस.आर. फंडातून विना परतावा भांडवल मिळवून देणे, महिलांसाठी विविध उद्योगांची निर्मिती, नामवंत उद्योग समुहांसमवेत करार करून मतदार संघातील महिलांना रोजगार मिळवून देणे, बाजारी पिशव्या शिवणार्‍या तसेच राखी बनवणार्‍या भगिनींसाठी स्वतंत्र उद्योग स्थापन्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

मोहनराव बडे, रवि बडे, भागवत बडे, बाळु दहिफळे, दत्ता तांबडे, हरीराम बडे, अशोक हजारे, महादेव काळे, सोनु कराड, प्रभाकर हजारे, शिवहार फड, केशवराव नाकाडे, लहूदास वाघमोडे, शाम सलगर, सतिष शिंदे, शिवाजी वाघमोडे, हनुमान हजारे, दत्ता वाघमोडे, अशोक खरबे, शिवाजी सलगर, बापुराव सलगर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment