तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

मतदान : देशसेवेची एक संधी.गणेश एन. सोळुंके (भोकरदन ग्रामीण)
--------------------------------

मतदान : देशसेवेची एक संधी

मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे आणि तो ही अगदी नि:पक्षपातीपणे. मात्र बऱ्याचदा असे होतांना दिसत नाही.
आपल्या अवतीभवती राहणारे अनेक लोक देशसेवेची कामे करत असतात. कुणी सैन्यात भरती होऊन देशाचे संरक्षण करून देशाची सेवा करतात, तर उद्योजक हा सुध्दा सुशिक्षीतांना रोजगार देऊन तसेच देशाचा आर्थिक विकास करत असतांना सुध्दा एक प्रकारे देश सेवाच करत असतो. संशोधक, शास्त्रज्ञ, शिक्षक, शेतकरी असे कितीतरी उदाहरणे आपण याप्रसंगी समोर ठेवु शकतो. त्याचप्रमाणे मतदान करणे हा सुध्दा एक देशसेवेचाच भाग आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी व सक्षम बनविण्यासाठी मतदान करणे खुप महत्वाचे आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळते. हा हेतू समोर ठेऊन देशाच्या प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की, आपण एकट्याने मतदान न केल्याने काय फरक पडणार आहे. मतदान करुन तरी कुठे आपला विकास होणार आहे. पण एका एका मताने सुध्दा येथे खुप फरक पडतो. थेंबे-थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आपण फुल नव्हे फुलाची पाकळी समजुन एवढी तरी देशसेवा करुच शकतो.
निवडणुकीचे चित्र सध्या खुपच विचित्र स्वरुप घेत असुन. अतिशय खालच्या थराला जाऊन विरोधकांवर चिखलफेक करुन आपलीच बाजु रेटण्याचा प्रयत्न बऱ्याचदा होतांना दिसुन येतो. मात्र आपण एक मतदार म्हणुन चिकीत्सक वृत्तीने योग्य तो निर्णय घेऊन योग्य तो व्यक्ती निवडुण देऊ शकतो. यात सुध्दा मतदारांना वेगवेगळी आमीषे दाखवुन त्यांची मते मिळविण्याचा, वेळप्रसंगी मत विकत घेण्याचे प्रसंग वाढलेले आहेत. मात्र कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार हेच आपल्यासाठी शस्त्र आहे. याचा योग्य वापर केल्यास नक्कीच ही परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
आता राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असुन मतदारांनी निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावुन एक शक्तीशाली राष्ट्र घडविण्यासाठी आपले एक मतदान खुप महत्वाचे आहे. आपण मतदानाचा हक्क बजावुन नक्की देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी सहकार्य कराल एवढीच अपेक्षा.

आपला,
गणेश नारायणराव सोळुंके, भोकरदन. 8390132085
gnsolunke0092@gmail.com

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment