तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

संजय गवळी यांची वंचित शहराध्यक्षपदी निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11 वंचित बहुजन आघाडी च्या बरखास्त केलेल्या सर्व कार्यकरण्याची पुन्हा बांधणी करण्यात आला आहे. त्यामध्ये  वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेबआंबेडकर यांचे  विश्वासू सक्रिय कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संजय गवळी यांची पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा मतदारसंघात परळीत जोमाने काम करण्यासाठी सर्वच स्तरावरील कार्यकरण्या जाहीर करण्यात आलेले आहेत, त्याच अनुषंगाने परळी विधानसभा मतदारसंघात काम करणारे व परळी शहरात सक्रिय असणारे संजय गवळी यांची नियुक्ती करून जिल्हा कार्यकारिणी त्यांचा सन्मान केला आहे व त्यांना त्यांच्या कार्याची पावती दिली आहे त्यांनी जिल्हा कमिटीचे आभार मानले आहेत व त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment