तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

ना.पंकजाताई मुंडेंच्या यांच्या प्रचारार्थ राजेश गित्ते यांचा दादाहारी वडगाव गटात धडाका

पर
ळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ  आज जिल्हा परिषद दादाहारी वडगाव गटात दौरा करण्यात आला. यावेळी  यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शेकडो कार्यकर्त्यांनी ना.पंकजाताई मुंडे यांच्या "कमळ" निशाणीला मतदान करा व पंकजाताईंना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा,अशी मागणी मतदारांकडे केली.

           दादाहारी वडगाव गटातील प्रत्येक गाव, तांड्यावर जाऊन राजेश गित्ते यांनी पिंजुन काढला आहे. महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देखील मतदार बांधवांना संवादातून सांगितली. तसेच  दादाहारी वडगाव गट हा मुंडे घराण्यावर नेहमी प्रेम करणारा मतदार संघ असून विरोधी पक्षाचे उमेदवार  तालुक्यातील असले तरीही भाजपाला मताधिक्य मिळण्याची तीच परंपरा कायम राहील असे म्हणून तालुक्यातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ताकदीने  पंकजाताई यांना मताधिक्य देऊन विजयात सिंहाचा वाटा उचलतील. असा विश्वास गित्ते यांनी व्यक्त केला..ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आहे. पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात कधी नाही तेवढे विकासाची कामे झाले आहेत त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी भाजपाच्या विधानसभा उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांना मतदार बहुमताने निवडून देतील. विरोधकांनी टिका करण्यापलीकडे सत्तेत असतानाही काही केले नाही, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचे काम टिका करण्याचे आहे भाजपाचे विकास करण्याचे धोरण आहे.  तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषगांने प्रचारानिमित्त भेट दिली. येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात वाजतगाजत यावेळी राजेश गित्ते यांचे स्वागत  केले. येत्या विधानसभा निवडणुकी मध्ये ना.पंकजाताई मुंडे यांना आशीर्वाद देऊन मतदानरुपी प्रेम कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a comment