तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Saturday, 26 October 2019

साखरा हिवरखेडा येथे मुसळधार पाऊस पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत


साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा खडकी बोरखेडि धोतरा येथील परिसरात मागील पाच ते सहा दिवसा पासून परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे त्यामुळे सोयाबीन काढनी थांबली आहे दिवाळीसन आला तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे दरवर्षी सोयाबीनची विक्री करून दिवाळीला खर्चासाठी शेतकऱ्यांना पैसा हातात येतो मात्र यंदा पावसाने सगळेच आर्थिक गणित बिघडले आहे दररोजच्या ढगाळ वातवरणाने चिंता लागली आहे पावसात सोयाबीन ला कोंब फुटले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या सूडीला पण कोंब फुटत आहेत तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पसरीला पूर्ण पणे पाण्यात खराब जाले आहे सोयाबीनसह पावसाने तूर कपाशि झेडू हे देखील पूर्ण पणे उध्वस्त जाले आहेत तूर हे सध्या च्या पावसाने पूर्ण पणे खाली पडल्या आहे व झेडू चे तर फारच मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहे यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी पैसाच नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे त्यामुळे परिसरातील बाजारपेठेत सध्या शूकशकाट दिसून येत आहे  या परिसरातील शेतकऱ्यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहे या भागतील सर्व पिकंाचे पंचनामे करून नुकसान भरपाई  देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरीकाकडून होत आहे


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment