तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

मतदार हाच लोकशाहीचा पाया


        -शिक्षणाधिकारी डॉ. पानझडे
भारत विद्यालयात साकारली मानवी रांगोळी
 बुलडाणा,दि. 10 : जिल्ह्यात  21 ऑक्टोबरला बहुसंख्य मतदारांनी मतदानाचा मताधिकार अंगीकार करावा. मतदार हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया आहे, असे विचार शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  डॉ. श्रीराम पानझाडे यांनी आज 10 ऑक्टोंबर रोजी  भारत विद्यालयात साकारण्यात आलेल्या मानवी रांगोळी प्रसंगी व्यक्त केले.
     भारत विद्यालयातील दीड हजार विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रिया समजून सांगणारी नयनरम्य मानवी रांगोळी साकारली होती. या मानवी रांगोळीमध्ये मतदान कक्षामध्ये मतदारांनी प्रवेश केल्यापासून प्रत्यक्ष मतदान करेपर्यंतची सर्व प्रक्रिया चित्रित करण्यात आली होती. या मानवी रांगोळीचे प्रदर्शन करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. उन्हाळे यांनी विद्यार्थ्यांनी पालकांकडे मतदानाला जाण्याबद्दलचा आग्रह धरावा, असे आवाहन  त्यांनी केले. 22 बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाही प्रक्रिया बळकट करावी, असे आवाहन बुलडाणा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी मतदार संघातील सर्व मतदारांना केले आहे.

       जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment