तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

परळीचा विकास हरवला असल्याची नेटिझन्सची तक्रार!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 10 --------  विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचार वेग घेत आहे. परळीच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत प्रचारात भावनेऐवजी आता लोक विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एका व्हायरल व्हीडिओच्या माध्यमातून परळीचा विकास हरवला असल्याची तक्रार इथल्या नेटिझन्सनी केली आहे. 

एका उपहासात्मक व्हीडिओच्या माध्यमातून ग्रामविकसमंत्री पंकजा मुंडे यांना नेटकऱ्यांनी चांगलेच चिमटे काढले आहेत. तीन वर्षांपासून खोदून ठेवलेला अंबाजोगाई रस्ता आता रागावून निघून गेला. तीन वेळा विविध मंत्री व आमदार-खासदारांनी उदघाटन केलेला परळीचा बायपास रुसून गेला तर बसस्थानाकाचा पुन्हा-पुन्हा उदघाटन केलेला फार्सही उघडा पडला. पंकजा मुंडे यांच्या अनेक हजार कोटींच्या विकासाच्या निव्वळ पोकळ गप्पा असल्याचे यातून उपहासात्मकरित्या दाखवले आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेल्या संकल्पात शेगाव येथील आनंदसागर उद्यानाच्या धर्तीवर येथील डोंगरतुकाई मंदिर परिसरात उद्यान उभारणार असे घोषित केले होते, प्रत्यक्षात मात्र ताई पाच वर्षात ताई तिकडे फिरकल्या सुद्धा नाहीत. या मुद्द्यांवरूनही ताईंचा विकास हरवला असून परळीत आता बदल हवा आहे अशी चर्चा नेटिझन्स करत आहेत. आज परळीसह बाहेरही या व्हायरल व्हीडिओची सर्वत्र चर्चा आहे.

No comments:

Post a Comment