तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 October 2019

परतीच्या पावसाने परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत द्या- राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेले पिक हातचे गेले आहे.परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या दिवाळीवर नुकसानीचे सावट होते.आज शेतकरी पुर्णतः हवालदिल झाला असून तात्काळ पिकांचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी,कृषि अधिकारी यांना गुरूवार,दि.31 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


परळी विधानसभा मतदारसंघाचे आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी विधानसभा अध्यक्ष तथा अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,माजी आ. पृथ्वीराज साठे,जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ दौंड,जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सिरसाट,ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील,नगरसेवक बबनराव लोमटे,अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती मिनाताई भताने,हणमंतराव मोरे,रणजित लोमटे,अजितदादा देशमुख, गणेश देशमुख,दामोदर कदम, कैलास गायकवाड,ज्ञानोबाराव जाधव,विलासबापु मोरे,सुधाकर शिनगारे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी,कृषि अधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांशी गावांना परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.आजही परतीचा पाऊस थांबायला तयार नाही. शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले सोयाबीन पिक,कापुस,ज्वारी,मका,तुर आदी पिके हातची गेली आहेत. या पिकांमुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे.आणि त्यातच राज्याच्या कृषी विभागाने व विमा कंपन्यांनी नाहक व डोकेदुखी वाढविण्याचे नियम काढले आहेत.ज्याचा परिणाम शेतक-यांच्या मानसिकतेवर होत आहे.तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देवून स्पष्ट केले आहे.की झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग व महसुल विभागाला सुचना देवून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पिक विमा मंजुर करावा व तसे आदेश विमा कंपन्यांना देण्यात यावेत शासनाने एकरी पंधरा हजार रूपये तातडीने मदत द्यावी असा अहवाल पुनर्वसन खात्याकडे पाठवावा,सन 2018-19 मधील खरीप व रब्बी पिकांचा विमा ज्या शेतकर्यांना मिळाला नाही. तो ताबडतोब वाटप करण्यात यावा,शेतकर्यांच्या शेतीमधील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा,अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे,पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरण्या करूनही पिके आलेली नाहीत.त्यांचा अहवाल शासनाकडे व विमा कंपनीकडे तात्काळ पाठवावा अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.येत्या 10 नोव्हेंबर पर्यंत मागण्यांची पुर्तता करण्यात यावी.अन्यथा शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर वसंतराव कदम,सरपंच सुधाकर शिनगारे, सरपंच बाबासाहेब सोनवणे, गौतम चाटे,आबासाहेब पांडे, वामन जाधव,ओबीसी सेलचे धनंजय शिंदे,अविनाश उगले, कल्याण उदार,गोविंद आरसुडे, हरिभाऊ कांबळे,अतहर जहागीरदार,वहिद खाँ पठाण, गणेश जाधव,पंडीतराव किर्दंत, ताराचंद शिंदे,रमेश पवार,किरण साळुंके,नरसिंग निकम,शेख मन्सुर,ज्ञानोबा गर्जे,व्यंकट गर्जे, गोपाळ सोमासे,बाबासाहेब कदम,बालासाहेब जाधव,सरपंच ज्ञानोबा जाधव,वसंत उदार, अजित गरड,श्रीमंत क्षीरसागर, गणेश भगत,विलास धावडे, गोपाळ सोमासे,ईश्‍वर शिंदे, चंद्रकांत वाकडे,बालासाहेब जाधव,बाबासाहेब किर्दंत,गणेश जाधव,शरद गंगणे,हरिश्‍चंद्र वाकडे,दगडु पटेल,अरूण शिनगारे,खिलापत अली, फत्ताउल्ला हाश्मी,माऊली औताडे,नवनाथ घाडगे,गौस हाश्मी,तात्याराव औताडे,गणपत भगत,श्रीपती औताडे,ताराचंद शिंदे,रामलिंग चव्हाण,सुंदर शिंदे,धर्मराज धुमाळ यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी

परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकर्‍यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे.या शेतकर्‍यांना तात्काळ शासनाच्या वतीने मदत द्यावी, खरीप व रब्बी पिक विमा द्यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे,प्रशासनाने या बाबत तातडीने कार्यवाही करावी. -गोविंदराव देशमुख (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई.)


परतीच्या पावसाने परळी मतदार संघात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

यावर्षी पावसाळा 

No comments:

Post a comment