तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

नेहरू युवा मंडळाच्या वतीने जिल्हा युवा समनव्यक यांचा सत्कारकेकतउमरा येथील नेहरू युवा मंडळाचा पुढाकार

फुलचंद भगत
 वाशिम-युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार द्वारा संलग्नित नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमराच्या वतीने वाशिम येथील नेहरू युवा केंद्र जिल्हा कार्यालयात नवनियुक्त जिल्हा युवा समनव्यक  सम्यक मेश्राम यांनी नुकताच पदभार स्विकारला.या वाशिम कार्यालयात रुजू झाल्याने त्यांचा नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळा केकतउमरा च्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर यांनी सत्कार केला.यावेळी केकतउमरा येथील नेहरू युवा मंडळाचे तथा नेहरू युवा राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादुर,मनोज भोयर,एमटीएस अनिल काकड यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलतांना जिल्हा समनव्यक सम्यक मेश्राम यांनी सत्कार केल्याबद्दल आभार मानून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.यावेळी नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी बोलतांना सांगितले की, आम्ही आपणाला आमच्या स्तरावरून सर्वोतोपरी मदत करायला तयार असून सर्वांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहाने नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम राबवू असे यावेळी प्रविण पट्टेबहादुर यांनी सांगितले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment