तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 21 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांनी नाथ्रा येथे बजावला मतदानाचा हक्क; मतदाना आधी घेतले वैद्यनाथ मंदिर, गोपीनाथ गडाचे दर्शनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. २१ --- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा भाजप महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांनी नाथरा येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या आधी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

   ना. पंकजाताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, यशःश्रीताई मुंडे यांनी प्रथम सकाळी  दक्षिणमुखी गणपती, प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करून दर्शन घेतले. त्यानंतर गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि नाथ्रा येथे ग्राम दैवताचे दर्शन करून सकाळी ११.०५ वा. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सकाळ पासून शहर व तालुक्यात पाऊस सुरू होता, त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला होता. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, पावसामुळे कंटाळून घरी बसू नका बाहेर येऊन मतदान करा, आपण खूप दिवसांपासून  पावसाची वाट पाहत होतो तो आता पडत आहे,ही गोष्ट चांगली आहे, आपणही मतदानाचा पाऊस पाडावा, सशक्त लोकशाहीसाठी मतदान करावे असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment