तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

आई जगदंबे दुष्काळाचे सावट दुर कर-भोजराज पालीवाल‌ भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाची पुर्णाहुतीने सांगता

 प
रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
अपुऱ्या पावसामुळे  संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले असून डोंगरदऱ्यातील शेतकरी हाती घेतलेल्या पिकाची होळी झाल्याने हतबल आहे. पावसाचे सर्व हंगाम कोरडे गेल्याने आता पिकाची कोणतीही खात्री नसल्याने दुष्काळाची छाया अधिक गडद होत आहे. या पार्श्वभूमीवर आई जगदंबेने शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस येण्यासाठी प्रसन्न व्हावे व हे दुष्काळाचे संकट दुर करावे अशी प्रार्थना शिवसेनेचे मा.शहरप्रमुख तथा भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भोजराज पालीवाल यांनी केली.
अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता कोणतेही पिक येणार नसून दुष्काळाची छाया अधिक वाढत असल्याने या परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. अत्यंत मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा देत शेती केली असून महागडे बि बियाणे व खते वापरून शेती केली. परंतू शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही पिक येणार नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटात आई जगदंबेनेे प्रेमाची साथ देण्याची गरज असून आई जगदंबे या भागातील शेतकऱ्यांवर आलेले दुष्काळाचे संकट दुर कर अशी प्रार्थना भोजराज पालीवाल यांनी केली. भवानीनगर दुर्गोत्सवाची सांगता पुर्णाहुतीने झाल्यानंतर आरती व प्रसाद कार्यक्रम पार पडला. यावेळी भोजराज पालीवाल यांनी देवीकडे सदरची प्रार्थना केली. 
यावेळी गजराज पालीवाल,महेश उर्फ पप्पू केंद्रे   यांच्यासह पदाधिकारी, नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment