तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

जि. प. माध्यमिक शाळा वाघाळाला विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटप्रतिनिधी
पाथरी:-क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व हिंगोली जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्येमाणे  पूर्णा वसाहत वसमत येथे विभागीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदरील स्पर्धा दिनांक १७ ऑक्टोबर  रोजी पार पडली . या स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाघाळा ता. पाथरी, जि. परभणी या संघाने परभणी ग्रामीण चे प्रतिनिधित्व करत विभागीय स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात उपविजेते पद तर १९ वर्षाखलील मुलांच्या गटात उपविजेते पद पटकावले.

       साखळी सामन्यांमध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने औरंगाबाद संघाला सरळ सेट मध्ये २-० ने हरवले व उपांत्यपूर्व फेरी मध्ये प्रवेश केला . उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये जालना संघाला धूळ चारत अंतिम सामना गाठला. परंतु अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये वाघाळा संघाला पराभव स्वीकारावा लागला. व तसेच १९ वर्षा खालील मुलांच्या गटात जी.प.माध्यमिक शाळेने परभणी ग्रामीणचे प्रतिनिधित्व करत बीड संघाला पहिल्या फेरीमध्ये  धूळ चारली व उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीमध्ये जालना संघास २-१ ने हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. परंतु अंतिम सामन्यात परभवाला सामोरे जावे लागले . तरी देखील विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपविजेते पटकवल्या बद्दल सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

      मुलींच्या संघात कर्णधार शेख आयेशा फकीर , घुंबरे ऐश्वर्या किशनराव, घुंबरे गायत्री बालासाहेब, नवघरे वैष्णवी शाहूरव, शेख सानिया हाफिज, पोपळघट साक्षी बाळासाहेब  या खेळाडूंचा समावेश होता तसेच १९ वर्षा खालील मुलांच्या संघात कर्णधार घुंबरे  सुमेध दत्ताराव , शेख आरेफ , साळवे ईश्वर सटवा  , हिवरे गोविंद बापूराव, शेख फयूम , पठाण अनवर अन्सर या खेळाडूंचा समावेश होता.

खेळाडूंच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका चव्हाण  मॅडम,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्याण राव घुंबरे,  उपाध्यक्ष शेख शाहिद , ज्येष्ठ शिक्षक स्वामी यु जी, श्रीनिवास कासले, सचिन वाघ, संदीप सुत्रावे, जाधव सर, बाबासाहेब नवघरे, सुशील घुंबरे,  विनायक काळे व सुशीला किरवले आदिनी  शुभेच्छा दिल्या व कौतूक केले  आहे.

     संघ व्यवस्थापक म्हणून गवारे राधाकृष्ण  यांनी काम पाहिले, तर  शकर धावारे व शेख मुजीब यांनी प्रशिक्षण दिले.

No comments:

Post a comment