परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.09........... भारताच्या चंद्रयान मोहिमेवर गेलेले इस्त्रोचे यान ज्या पध्दतीने अयशस्वी झाले, त्याचप्रमाणे परळी-अंबाजोगाई रोडवर उतरलेल्या एलियनलाही चंद्रयान मोहिमेसारखाच त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मिडीयावर आज व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे परळी-अंबाजोगाई रस्त्याची दूर्दशा राज्यभर पोहचली असून, त्याची सोशल मिडीयात जोरदार चर्चा होत आहे.
परळी-अंबाजोगाई हा 22 कि.मी. चा रस्ता मागील 3 वर्षांपासून उखडून ठेवला असून, कोणतेही काम न केल्याने नागरिकांना, वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने करून ही आणि भाजपच्या पालकमंत्री, खासदारांनी एक महिन्याच्या आत रस्ता करण्याचे आश्वासन देवूनही रस्ता झाला नसल्याने नागरिकांमध्ये तिव्र संताप उमटला असून, हा रोष येत्या विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला बसणार असे दिसू लागले आहे.
या संदर्भात सोशल मिडीयावरूनही जोरदार टिका होवू लागली असून, अज्ञात नेटकर्यांनी चक्क चंद्रयान मोहिम टीमचा एक व्हिडीओ करून या रस्त्याची दूर्दशा मांडली आहे. या व्हिडीओत चंद्रयान मोहिम सुरू झाल्यानंतर तेथे यान उतरल्यानंतर चंद्राचा पृष्ठभाग जसा ओबड-धोबड खड्डे असल्यासारखा दिसतो, तो दाखवून एक एलियान या रस्त्यावर उतरवला आहे. हा रस्ता म्हणजे ही चंद्राच्या पृष्ठभागासारखा खराब झाल्याचे दाखवले असून, चंद्रभूमीवर आपले स्वागत आहे, अशा ओळी लिहून 4 वर्षापासून दुरूस्त झाले नाही रस्ते, नुसतीच बोलबाजी करून झाले सगळे काम फत्ते असे म्हणत या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्याचा फटका चालू निवडणुकीत पंकजाताईंना बसल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा परळीकरांमध्ये होवू लागली आहे.
No comments:
Post a Comment