तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 25 October 2019

पाथरी तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी;साेयाबीन,कापसाचे नुकसान;ज्वारीची करावी लागणार दुबार पेरणी


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-मागिल दाेन महीण्या पासून पाथरी तालुक्यात सतत पाऊस पडत आहे दाेन मंडळात सरासरी पेक्षा पुढे पाऊस पडला असून गुरूवारी रात्री तीन ही मंडळात अतिवृष्टी  झाल्याने खरीपाच्या पिका सह रब्बी ज्वारीची पुन्हा पेरणी करावी लागणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
 अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे; तर बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या दोन्ही प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागा तर्फे सांगण्यात आले हाेते. सोमवारी २१ ऑगष्ट राेजी राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ हवामानासह ऊनही पडत होते.

 अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होत असल्याने या भागात पावसाने जोर धरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात  वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून, उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. संततधार पाऊस, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली. दोन दिवसांपासून ऑक्टोबर हीटचा चटका कमी झाला. मात्र मागिल आठ दिवसा पासून पाथरी तालुक्यात सतत पाऊस पडत आहे गुरुवारी सायंकाळी पाथरी मंडळात ८१मीमी, हादगाव मंडळात ८९मीमी,तर बाभळगाव मंडळात ८०मीमी सरासरी ८३.३३ अशी अतिवृष्टी झाली असून आज पर्यंत या तीन ही मंडळात पाथरी ११७९मीमी, बाभळगाव ५७४ मीमी तर हादगांव ९२२मीमी असा सरासरी ८९१.६६मीमी पाऊस झाला आहे. पाथरी तालुक्याची वार्षिक सरासरी ही ७६८.५० एवढी असतांना प्रत्यक्षात ८९१.६५ मीमी असा सरासरीच्या ११७.८ टक्के एवढा पाऊस जास्त झाल्याने काढनीला आलेले साेयाबीन पुर्ण पणे वाया गेले असून वेचनीला आलेल्या कापुस बाेंडातच अंकुर फुटून वाया गेला आहे तर रब्बी ज्वारी चे काेवळे माेड करपुन गेल्याने शेतक-यांना  दुबार पेरणी करावी लागणार आहे.अशा परिस्थितीत आता कृषी विभागाने पंचनामे करून शेतक-याना  पिक विमा आणि शासनाने मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून हाेत आहे.

No comments:

Post a Comment