तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 October 2019

राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले बुलडानेकर:• उत्स्फूर्त प्रतिसाद
:जिल्हाधिकारी यांनी दाखविली  एकता दौडला हिरवी झेंडी
बुलडाणा, दि. ३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज, ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये बुलडाणेकर राष्ट्रीय एकात्मतेसाठी धावले. या दौडमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थी, युवक, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी, नागरिक या एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  दौडचा शुभारंभ जिजामाता प्रेक्षागार येथून जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील - भुजबळ यांनी हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
   यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे, तालुका क्रीडा अधिकारी श्री. धरपकवार यांच्यासह स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 सदर दौड संगम चौक, जयस्तंभ चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक चौक मार्गे पुन्हा जिजामाता प्रेक्षागार येथे आल्यानंतर दौडचा समारोप झाला.
विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, अधिकारी-कर्मचारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, खेळाडू व नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment