तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 22 October 2019

मुंबई.नागपूर महामार्गावर खड्डे बुजवतोय भाऊसाहेब थोरात नावाचा समाजसेवक

औरं
गाबाद (प्रतिनिधी) :- ए.एस.क्लब ते वैजापूर पर्यंत जाणारा मुंबई-नागपूर राज्य महामार्ग अक्षरशा खड्ड्यानी चाळणी झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळेनासे झाल्याने अनेक निष्पाप बळी या रस्त्याने घेतले आहे  विशेष म्हणजे या रस्त्यावर टोलनाका सुद्धा आहे व टोल वसुलीहि दररोज 24 तास इमानेइतबारे वाहनधारक भरत आहे.
                   हा रस्ता म्हणजे औरंगाबाद मार्गे शिर्डी जातो थेट विदर्भ व मराठवाड्यातून अनेक साईभक्त याच खड्ड्यातून साईंच्या दर्शनाला जात असताना अनेक अपघात दररोज घडत आहेत व निष्पाप जीवांचा बळी या रस्त्यांची घेतला असल्याने भानवाडी येथील समाजसेवक भाऊसाहेब थोरात यांनी एकट्याने हे खड्डे भरण्याचा सपाटा चालवला आहे याबाबत थोरात यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की या महामार्गावर दहेगाव,करंजगाव,लासुरगाव,हड्स पिंपळगाव दरम्यान अनेक मोठाले खड्डे पडले आहे त्यामुळे गेल्या महिन्याभरातच अनेक वाहनधारकांचे हकनाक जीव गेले आहे दहेजवल तर 20 फूट लांब व 3 फूट खोल असे खड्डे पडलेले होते ते खड्डे दगड भरून बुजवले गेले परंतु अनेक खड्डे तसेच ठेवल्याने  छोटेमोठे अपघातांची मालिका चालूच होती त्यात मागील वर्षी तर लहान मुलांचा सुद्धा जीव या खड्डनी  घेतल्यामुळे हे जग पाहण्याआधीच हकनाक त्या लेकरांचा बळी गेल्याने मला राहवले नाही त्यामुळे संवेदनाशून्य समाजात वावरताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घमेले पावडे खांद्यावर घेऊन मी हे खड्डे बुजवत आहे यापूर्वीही अनेक खड्डे मी बुजवले आहे व आत्ता पण जेवढे शक्य आहे तेवढे खड्डे मी बुजवणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
              मुळात जर रस्त्यात खड्डे असले तर ती खड्डे बुजवण्याची जबाबदारी हि संबंधीत टोल वसुली करणाऱ्या ठेकेदारांची असते व ठेकेदराने खड्डे बुजवले नाही तर टोल भरण्यास वाहनधारकास बंधनकारक नसते याविषयी टोलनाक्यावर अनेकवेळी वाहनधारक व टोल वसुली करणाऱ्या मुलांत अनेक वेळेस वादविवादहि होतात परंतु ही बाब प्रशासकीय असल्याने आपण त्या फँदात न पडता खड्डे स्वतः बुजवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment