तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

वन जमिनीवरील अतिक्रमण स्वत:हून काढावेवन विभागाचे आवाहन

बुलडाणा दि. 18: जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण धारकांनी भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 26 नुसार राखीव वनांवर विना परवाना प्रवेश करणे जमीनीचे विच्छेदन करणे, अतिक्रमण करुन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ताबा घेणे दाखलपात्र व अजामीन पात्र गुन्हा आहे. या करीता भा. दं. वि. चे कलम 447,448 तसेच भा. व.अ. 1927 चे कलम 26 नुसार 6 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा पाच हजार दंड वा दोन्ही होऊ शकते. तरी संबधित सर्व अतिक्रमण धारकांनी नोटीस प्रकाशित झालेल्या दिनांकापासून 3 दिवसांच्या आत स्वत:हून वनजमिनीवरील अतिक्रमण काढून घेण्यात यावे अन्यथा अतिक्रमण वन विभागामार्फत हटवून ताब्यात घेण्यात येईल. या दरम्यान उद्भवणाऱ्या परिणामांची संपुर्ण जबाबदारी संबंधित अतिक्रमण धारकांची राहील यांची नोंद घ्यावी, करीता जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येत आहे, असे उपवनसंरक्षक वन विभाग यांनी

प्रसिध्दी  पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                                      - - - - - - - - - -

मतमोजणीच्या कामामुळे जात पडताळणी समिती कार्यालयाचे कामकाज स्थगित

बुलडाणा दि. 18: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संपूर्ण कार्यालय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कामकाजासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतमोजणीचे कामकाज सुरू असल्यामुळे समितीचे कार्यालय 18 ऑक्टोंबर 2019 पासून ते मतमोजणीचे कामकाज संपेपर्यंत स्थगित राहणार आहे. तरी समितीच्या कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांनी या कालावधीत न येता आपली गैरसोय टाळावी,  असे सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment