तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

परळीत शिवसेनेला हादरा; युवासेनेचे तालुकाप्रमुख अमर टाकळकर असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.12.............. भाजपा, वंचित पाठोपाठ शिवसेनेमधूनही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या वाढत असून, शनिवारी युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमर टाकळकर यांनी आपल्या असंख्य युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसह धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत प्रवेश केला.

ज्येष्ठ नेते  बाळासाहेब देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्यात अमर टाकळकर यांच्यासह अनिकेत देशमुख, ऋषिकेश फरताळे, मुन्ना गरड, विजय खोले, तेजश वाघमारे, सुरज पांचाळ, अमोल मेंडके, रामेश्वर लकडे, गणेश खिरे, वसंत काकडे, अविनाश ढमुने, शैलेश काकडे, विजय पोखरकर, महेश धायगुडे, शुभम बुलबुले, रोहित खाकरे, विजय मुंडे, रवि कोरे, रवि राऊत, अशोक ढोकरे, विशाल देशमुख, पवन देशमुख, अलंकार मुंडे, सागर मुंडे, प्रणव सोनवणे, महादेव कसबे, गणेश काळे, अनंत सुर्यवंशी, प्रकाश दराडे, गणेश शिंदे, संजय किरवले, डाबी येथील उध्दव मुंडे, सुरज मुंडे, अंकुश मुंडे, सायस मुंडे, दयानंद मुंडे, मंगेश मुंडे, वैजनाथ मुंडे, गोरख मुंडे, गोविंद पारवे, नागनाथ मुंडे, माणिक मुंडे, बाबा मुंडे, विशाल जाधव, पवन राठोड, भिमा राठोड, नितीन जाधव, अवधूत चव्हाण, इंदपवाडी येथील गोविंद जोगदंड, बालाजी पारधे, संदिप पारधे, प्रदिप पारधे, उमेश रोडे, सचिन मुंडे, पिराजी उपाडे, मिलिंद शिंदे, अनिल शिंदे, सुनिल मुंडे, आकाश पारधे, सचिन पारधे, सुनिल पारधे, भोपळा येथील सुरज मुंडे, बाबुराव मुंडे, मनोज शिंदे, मुकेश, अशोक फड, पवन मुंडे, राजेभाऊ मुंडे, केशव मुंडे, शारदानगर येथील धनंजय मुंडे, महेश धायगुडे, रोहित क्षीरसागर, शुभम खाकरे, रोहित खाकरे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

टाकळकरांना मोठी जवाबदारी देवु- धनंजय मुंडे

अमर टाकळकर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची युवक आघाडी अधिक मजबुत झाली असून, अमर टाकळकर यांना मोठी जवाबदारी देण्याचा शब्द धनंजय मुंडे यांनी प्रवेशाच्यावेळी दिला.

धनंजय मुंडेंच्या विजयासाठी जीवाचे रान करू-अमर टाकळकर परळी

शहराचा विकास केवळ धनंजय मुंडे यांचे तरूण नेतृत्वच करू शकते, तरूणांचे आज ते आयकॉन बनले आहेत, म्हणूनच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून, त्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान करू अशी ग्वाही अमर टाकळकर यांनी यावेळी केली.  

No comments:

Post a Comment