तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

गेवराई तालुक्यातील कटचिंचोली ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ११ _ कसल्याही प्रकारचा विकास नसल्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर गेवराई तालुक्यातील कटचिंचोली ग्रामस्थांनी एकमुखी बहिष्कार टाकला असल्याचे सविस्तर निवेदन गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
          देण्यात आलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, दैठण ते कटचिंचोली रस्ता केला नाही, असुरक्षित विद्युत पोल व त्यावरील तारा मोडकळीस आल्या आहेत, गावांतर्गत रस्ते विकास झाला नाही, गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापण नाही, गावातील शौचालयाचे बांधकाम करुनही अनुदान देण्यात आले नाही, पाणी पुरवठा सुरळीत चालू नाही, नाल्यांचे बांधकाम नाही, कटचिंचोली ते पांगुळगावचा रस्ता नाही, शेततळे व शेतरस्ते नाही, स्मशानभूमी नाही, कटचिंचोली ते रेवकी रस्ता नाही आदींसह कसलाही विकास करण्यात आला नसल्याने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर गेवराई तालुक्यातील कटचिंचोली ग्रामस्थांनी एकमुखी बहिष्कार टाकला असल्याचे सविस्तर निवेदन गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. परिणामी  प्रशासन व लोकप्रतिनिधीं यांच्या बाबतीत नाराजी आणि द्वेष व्यक्त करण्यात आला आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

1 comment:

  1. प्रशासनाने याचा विचार करायला हवा .

    ReplyDelete