तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता विकास कन्या ना पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करून विकासाचे भागीदार व्हा -अशोक जैन


      परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- दि.11
                     विरोधकांकडे विकासाचा एकही मुद्दा नसल्याने ते मतदार जनतेचं लक्ष विचलित करून, दिशाभुल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र येथील सुजाण मतदारांनी विरोधकांचा हा डाव हाणुन पाडुन, परळीसह बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विकास कन्या ना पंकजाताई मुंडे यांनाच विक्रमी मताधिक्यांनी विजयी करून पुन्हा विधानसभेत पाठवुन, विखासाचे भागीदार व्हा. असे आवाहन वैद्यनाथ बॅंकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.
            परळी विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना व मिञ पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ वैद्यनाथ बॅंकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी मतदार संघात अनेक ठिकाणी मतदारांच्या काॅर्नर बैठका घेतल्या. यावेळी काॅर्नर बैठकात बोलताना जैन म्हणाले की, लोकनेते स्व.गोपीनाधरावजी मुंडे साहेब यांच्या आशीर्वादाने ना.पंकजाताई मुंडे यांनी समाजसेवेचा वसा घेतला असुन,त्यांनी गेल्या पाच वर्षांत परळी मतदार संघात कोट्यावधी रुपयांचे विकास कामे आणुन ते प्रत्यक्षात राबवली. ना.ताईनी परळी मतदार संघांच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासु दिली नाही. यासोबतच ना.ताईनी वैयक्तीक ही जनतेची कामे केली आहेत. परळीसह बीड जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष बाकी असुन, तो पुर्ण करण्यासाठी याही वेळी ना.पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्ते व नागरिकांनी स्वत:हुन ना.ताईची प्रचार यंञणा हाती घेऊन, महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यांनी ना.पंकजाताई मुंडे यांना विजयी करावे. असे आवाहनही यावेळी अशोक जैन यांनी केले. जैन यांच्या काॅर्नर बैठकांना ठिकठिकाणी मतदार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे  .

No comments:

Post a Comment